Ad will apear here
Next
जन्मशताब्दी वर्षानिमित्त जागतिक पातळीवर ‘पुलोत्सव’
आठ नोव्हेंबरला ग्लोबल पुलोत्सवाचे उद्घाटन
पुणे : ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदा ‘पुलोत्सव’ जागतिक पातळीवरही साजरा होणार आहे. पुण्यासह देशातील २० शहरे आणि देशाबाहेरील पाच खंडांमधील ३० शहरांत हा ‘ग्लोबल पुलोत्सव’ येत्या आठ नोव्हेंबरपासून साजरा केला जाणार आहे,’ अशी माहिती ‘पुलं’च्या परिवारातील ज्योती ठाकूर, ‘आशय सांस्कृतिक’चे सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली. 

या वेळी पुण्यभूषण फाउंडेशनचे डॉ. सतीश देसाई, गजेंद्र पवार, कृष्णकुमार गोयल, ‘मसाप’चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, मेघराज राजेभोसले, नयनीश देशपांडे, मयूर वैद्य उपस्थित होते. परिवार, आशय सांस्कृतिक यांनी उत्सवाचे आयोजन केले आहे; तसेच पुण्यभूषण प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद (पुणे) या संस्थांचा देखील संयोजनामध्ये सहभाग आहे.

आठ नोव्हेंबर २०१८ ते आठ नोव्हेंबर २०१९ हे पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने हा उत्सव वर्षभर चालणार आहे. आठ नोव्हेंबरपासून याची सुरुवात होणार असून, भांडारकर रस्त्यावरील मालती माधव या ‘पुलं’च्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता ‘गुणिजनांचा मेळा’ भरणार आहे. यात चित्रपट, संगीत, साहित्य, कला क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी पाच वाजता जन्मशताब्दी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या वेळी ‘ग्लोबल पुलोत्सव’च्या बोधचिन्हाचे अनावरण होणार आहे. 

‘‘पुलं’चे साहित्य शाळा, महाविद्यालयांपर्यंत म्हणजे पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मी एक पुलं प्रेमी’  ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक शहरातील १५ महाविद्यालयांमध्ये त्यांच्या साहित्याबद्दल सर्वेक्षण करण्यात येईल,’ असे वीरेंद्र चित्राव यांनी सांगितले.


‘मसाप’चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी म्हणाले, ‘साहित्य परिषदही ८० शाखांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे. ‘पुलं’च्या साहित्यातील वेगळेपणाची ओळख करून देणारा साहित्य पत्रिकेचा अंकही परिषदेमार्फत प्रकाशित करण्यात येणार आहे.’

 नाट्य परिषद आणि चित्रपट महामंडळामार्फतही ‘पुलं’च्या साहित्यावर दर महिन्याला एक कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे राजेभोसले यांनी सांगितले. 
डॉ. सतीश देसाई म्हणाले, ‘मराठी साहित्यिकाच्या नावाने जगभरात प्रथमच असा उत्सव होत आहे. ग्लोबल पुलोत्सवाच्या निमित्ताने विविध देशांमधील महाराष्ट्र मंडळे एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. या उत्सवाच्या काळात कार्यक्रमांचे आयोजन हीच मंडळे करतील. त्यांना हवे असलेले कलाकार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.’

‘वक्ता दशसहस्रेषु’ खास आकर्षण 
‘ग्लोबल पुलोत्सव’च्या निमित्ताने उद्घाटन सोहळ्यात ‘वक्ता दशसहस्रेषु’ हा ७५ मिनिटांचा लघुपट सादर होणार आहे. यात ‘पुलं’ची तीन अप्रकाशित भाषणे पाहावयास मिळणार आहेत. त्यासह अनेक दुर्मीळ दृकश्राव्य कार्यक्रमांचा यात समावेश आहे. ‘पुलं’च्या कुटुंबीयांच्या वतीने हा दुर्मीळ ठेवा रसिकांसाठी खुला करण्यात आला आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZLYBT
Similar Posts
पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त बिल्हण संगीतिकेचे आयोजन पुणे : अवघ्या महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. १२ जून हा पुलंचा स्मृतिदिन. यानिमित्त पु. ल. कुटुंबीय, कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आशय सांस्कृतिक आणि स्क्वेअर वन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी नऊ ते ११ या वेळेत ‘एक पुलकित सकाळ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी
मी ‘पुलं’चा एकलव्य : अशोक सराफ पुणे : ‘‘पुलं’चा प्रत्यक्ष सहवास मला लाभला नसला, तरी त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमातून मी कायमच त्यांच्या सहवासात असतो. साहित्यातून पात्र उभे करण्याची ‘पुलं’ची शैली अवगत करून मी ती माझ्या अभिनयाद्वारे चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी यशस्वी ठरलो आहे. मी ‘पुलं’चा एकलव्य आहे.
‘पुलं’च्या जन्मशताब्दी वर्षानिमित रत्नागिरीत कार्यक्रम रत्नागिरी : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आठ नोव्हेंबर २०१८पासून सुरुवात होत आहे. यानिमित्त रत्नागिरीतील आर्ट सर्कल संस्थेतर्फे वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. आठ नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात
झाकीर हुसैन यांना ‘पु. ल. स्मृती सन्मान’ जाहीर पुणे : पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिक यांच्या वतीने आणि स्क्वेअर वनच्या सहयोगाने १७ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत पुलोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language